नागभीड तालुक्यात आंबाडी सरबत उद्योगास वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:53 AM2020-12-17T04:53:20+5:302020-12-17T04:53:20+5:30

फोटो घनश्याम नवघडे नागभीड : उन्हाळ्यात उन्हाची काहिली कमी करणारा आणि खेडयांमध्ये घरोघरी वापरल्या जाणाºया आंबाडीच्या सरबत उद्योगास ...

Mango syrup industry in Nagbhid taluka | नागभीड तालुक्यात आंबाडी सरबत उद्योगास वाव

नागभीड तालुक्यात आंबाडी सरबत उद्योगास वाव

Next

फोटो

घनश्याम नवघडे

नागभीड : उन्हाळ्यात उन्हाची काहिली कमी करणारा आणि खेडयांमध्ये घरोघरी वापरल्या जाणाºया आंबाडीच्या सरबत उद्योगास नागभीड तालुक्यात मोठा वाव आहे. मात्र त्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे.

नागभीड तालुक्यात धानाची शेती होते. पाºयांवर तुरी लावल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक शेतकºयांच्या शेतातील पाºयांवर ही वनस्पती अगदी सहज उगवते. या वनस्पतीच्या पाल्याचा उपयोग भाजीमध्येही मोठया प्रमाणात करण्यात येतो. आयुर्वेदात आंबाडीला मानाचे स्थान आहे.

दिवाळीच्या सुमारास आंबाडी परिपक्व होते. परिपक्व झाल्यानंतर आंबाडीचे फळ लालभडक होते. चवीला आंंबट असल्याने या फळाचा ग्रामीण भागात भाजीमध्येही उपयोग केला जातो. मात्र या आंबाडीचा सर्वात जास्त उपयोग सरबतासाठी केला जातो. फळ परिपक्व झाले की आंबाडीचे झाडांची कापणी करून ते घरी आणल्या जाते. नंतर फळावरील लालभडक दिसणारा भाग वेगळा करून तो वाळवल्या जातो. चांगला वाळल्यानंतर खलबत्त्यामध्ये बारिक कूट केल्या जातो. नंतर बारिक करण्यात आलेल्या या कुटाचा उन्हाळ्यात सरबतासाठी उपयोग करण्यात येतो. खेड्यापाड्यात या सरबतास मोठी पसंती आहे. शहरात स्थायिक झालेले अनेक व्यक्ती गावी आल्यानंतर आंबाडीचे हे कूट घेऊन जात असतात व उन्हाळ्यात त्याचा सरबतासाठी उपयोग करीत असतात. खेडयापाडयामध्ये उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस कोणी पाहुणा आला तर हमखास त्याच्या हातात आंबाडीच्या सरबताचा ग्लास ठेवल्या जातो. आंबाडीचे सरबत उन्हाळ्यात अतिशय गुणकारी समजल्या जाते.

बॉक्स

एखादा मोठा उद्योग येण्याची गरज

व्यावसायिक रूपाने या आंबाडीवर प्रक्रिया करून त्याचे सरबत तयार करण्यात आले तर या आंबाडीच्या पिकास चालना मिळू शकते. मागणी वाढल्यास शेतकरी आंबाडीचे पीकही घेऊ शकतात. उद्योगाचे रूप दिल्यास काही तरूणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी एखाद्या उद्योजकाने पुढे येण्याची गरज आहे. एवढेच नाही तर आंबाडीच्या बियांमध्ये तेलाची मात्रा मोठ्या प्रमाणात आहे. या आंबाडीचा उपयोग तेलासाठी होतो.एकंदर यानिमित्ताने दोन उद्योग उभे राहू शकतात.

Web Title: Mango syrup industry in Nagbhid taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.