मनपाकडून नाल्यांच्या मान्सूनपूर्व सफाईला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:54 PM2018-05-18T22:54:48+5:302018-05-18T22:54:48+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३ मे रोजी महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व नाले स्वच्छता आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नियोजन करण्यात आले.

Mankad's start of monsoon cleanliness of Nallah | मनपाकडून नाल्यांच्या मान्सूनपूर्व सफाईला सुरूवात

मनपाकडून नाल्यांच्या मान्सूनपूर्व सफाईला सुरूवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३ मे रोजी महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व नाले स्वच्छता आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नियोजन करण्यात आले.
पुढील महिन्यात मान्सून अपेक्षित असल्याने पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरु नये, नागरिकांची कोणत्याही स्वरुपाची जीवित वा वित्त हानी होऊ नये, यासाठी शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई लवकरात लवकर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानुसार स्वच्छता विभागातर्फे नालेसफाई मोहीम युद्धस्तरावर हाती घेण्यात आली आहे. शहरातील आदर्श पेट्रोल पंप ते मच्छिनाला, सावरकर नगर, बगड खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर, सिस्टर कॉलनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एसपी कॉलेज ते नगराळे दवाखाना आदी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती, दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे. सदर मोहिम उपायुक्त विजय देवळीकर यांच्या निरीक्षणात, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) नितीन कापसे, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, भूपेश गोठे यांच्या उपस्थितीत सुरु आहे.

Web Title: Mankad's start of monsoon cleanliness of Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.