मानोरा तलावाला आकर्षक करणार

By admin | Published: May 1, 2016 12:29 AM2016-05-01T00:29:48+5:302016-05-01T00:29:48+5:30

देशी-विदेशी पक्ष्यांचे आवडते स्थळ व पक्षीप्रेमींचे आकर्षण असलेल्या मानोरा लघु तलावाला अधिक आकर्षक बनविण्यासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पर्यटन विकासमधून निधी उपलब्ध करून देऊ,...

Manora Lake will be attractive | मानोरा तलावाला आकर्षक करणार

मानोरा तलावाला आकर्षक करणार

Next

सुधीर मुनगंटीवार : देशविदेशातील पक्ष्यांचा तलावात संचार
चंद्रपूर : देशी-विदेशी पक्ष्यांचे आवडते स्थळ व पक्षीप्रेमींचे आकर्षण असलेल्या मानोरा लघु तलावाला अधिक आकर्षक बनविण्यासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पर्यटन विकासमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील मानोरा लघु तलाव दुरुस्तीचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जे. एम. शेख, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता नागपुरे, उपअभियंता प्रधान, शाखा अभियंता आयलानवार व हरीश शर्मा यावेळी उपस्थित होते.
३७८ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या मानोरा लघु तलावातून सध्या ५०० हेक्टर सिंचन होत आहे. या तलावाची दुरुस्ती व गाळ काढण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार या तलावाची दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामाला जलयुक्त शिवार योजनेत मंजुरी देण्यात आली. ३७.४८ लाख रुपये किमतीचे हे काम आहे.
या तलावातून ३६ घनमीटर गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे. गाळाचा उपयोग धरण पाळी मजबुतीकरण, कालव्याच्या सेवा पथकाचे मजबुतीकरण व जंगलातून येणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरणासाठी करण्यात येणार आहे. या भागात हा एकमेव तलाव असून या तलावावर देशविदेशातील पक्षी भ्रमंतीसाठी येतात. वाघ तसेच इतर प्राण्यांसाठी हाच एक तलाव आहे. या ठिकाणी पर्यटक व पक्षीप्रेमी नेहमी येत असतात. त्यामुळे या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Manora Lake will be attractive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.