मानोरात साकारतेय मॉडेल आरोग्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:20 AM2018-05-18T00:20:38+5:302018-05-18T00:20:38+5:30

तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून केली होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही मागणी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लावून धरली.

Manorat Model Model Health Center | मानोरात साकारतेय मॉडेल आरोग्य केंद्र

मानोरात साकारतेय मॉडेल आरोग्य केंद्र

googlenewsNext
ठळक मुद्देदहा कोटींचा निधी मंजूर : निवासासह सुसज्ज इमारत

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून केली होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही मागणी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लावून धरली. निवडणुका होताच सुधीर मुनगंटीवार यांनी मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला विशेष बाब म्हणून मान्यता मिळविली. महाराष्ट्रातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम वेगाने सुरु असून डिसेंबर २०१८ पर्यंत बांधकाम पूर्ण करुन जनतेच्या सेवेत कार्यरत होणार आहे.
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा व परिसर आदिवासीबहुल असून येथील नागरिकांना आरोग्यासाठी कोठारी- बल्लारपूर व चंद्रपूर येथे जावे लागत असे. आरोग्याची सुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास व वेळी अवेळी दवाखान्यात जाण्यासाठी वातहुकीची साधने नसल्याने आर्थिक त्रासासह शारिरीक त्रास सहन करावा लगात होता. या परिसरातील जनतेने मानोरात आरोग्य केंद्राची सतत केली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जि. प. निवडणुकीदरम्यान मानोरात प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने १० मार्च २०१७ ला विशेष बाब म्हणून मंजुरी दिली. त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. आरोग्य केंद्रासाठी लागणारी जमीन अधिग्रहीत करुन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम सुरु केले.
मानोराचे आरोग्य केंद्र महाराष्ट्रातील मॉडेल म्हणून ओळखले जावे व ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा नियमित मिळावी, यासाठी कर्मचारी निवासासह केंद्राची सुसज्ज इमारत उभी होत आहे. यात एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, शवविच्छेदन गृह व ३० बेडची अद्ययावत सुविधा असणार आहे. या केंद्रासाठी कमतरता भासणार नाही, याची दक्षतासुद्धा घेतली जाणार आहे. लवकरच या आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे.

Web Title: Manorat Model Model Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.