मनपाने बालरुग्णालय उभारणीची तयारी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:33+5:302021-05-25T04:32:33+5:30
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, संदीप आवारी, मनपा आयुक्त ...
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, संदीप आवारी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता अ. र. भास्करवार, उपायुक्त वाघ आदी सहभागी झाले होते. आमदार मुनगंटीवार म्हणाले, बाल रुग्णालयाची जागा मोठी असावी, नजीकच एक बगीचा तयार करावा, बोलक्या भिंतींसह, बालकांसाठी आनंद देणाऱ्या बाबींचा अंतर्भाव असावा. यासाठी सुमारे १५ ते २० कोटींचा निधी उभारण्याची गरज आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे शिवाय केंद्र सरकारच्या कामगार विभागाकडूनही मदत घेता येऊ शकते, असेही आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
जागेचा प्रस्ताव सादर
शिशु रुग्णालय उभारणीसाठी मनपा सर्वशक्तीनिशी पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली. आसरा कोविड रुग्णालय शेजारी किंवा सराई मार्केटमधील यापैकी एक जागा बाल रुग्णालयाला उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. जागा निश्चित झाल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने करू, असे आश्वासन मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.