मनपाच्या रस्ता बांधकामात गैरव्यवहार
By admin | Published: January 14, 2015 11:06 PM2015-01-14T23:06:18+5:302015-01-14T23:06:18+5:30
केवलराम चौक ते दाताळा इरईनदीपर्यंत तसेच बिनबा गेट ते रेव्हेन्यु कॉलनी चौक हे दोन रस्ते पुरग्रस्त असल्यामुळे सिमेंटचे घेण्यात आले. मात्र या रस्त्यांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने
आयुक्तांना निवेदन : निकृष्ट दर्जाचे वापरले सिमेंट
चंद्रपूर : केवलराम चौक ते दाताळा इरईनदीपर्यंत तसेच बिनबा गेट ते रेव्हेन्यु कॉलनी चौक हे दोन रस्ते पुरग्रस्त असल्यामुळे सिमेंटचे घेण्यात आले. मात्र या रस्त्यांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने या रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
या भागातील जनतेला होणारा त्रास कमी व्हावा यासाठी वरील रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असुन या रस्त्यासाठी वापरण्यात येणारे सिमेंट आंध्रप्रदेशातील लहान सिमेंट कंपन्यातील निकृष्ठ दर्जाचे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. केवलराम चौक ते दाताळा ईरई नदीवरील पूल व बिनबा गेट ते रेव्हेन्यु कॉलरी चौक (व्हाया रहेमतनगर)या नवीन रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ असुन पृष्ठभाग सुद्धा सपाट नाही. यामध्ये शासनाच्या पैशाचा दुरूपयोग होत आहे. या रस्त्याची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)