घनकचºयापासून खतनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:04 PM2017-10-09T23:04:01+5:302017-10-09T23:04:16+5:30
महानगरपालिका, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क आणि मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने घनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिका, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क आणि मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने घनकचºयापासून खत निर्मितीचा प्र्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त संजय काकडे यांनी केले.
ओल्या कचºयापासून खत निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केल्याने आतापर्यंत २२३ ठिकाणी खत निर्मिती केली जात आहे. चंद्रपूर शहराला घनकचºयापासून मुक्ती मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय असून, त्याकरिता मुक्ती फाउंडेशनने विशेष प्रयत्न केले. घनकचºयाचे वर्गीकरण न केल्याने डम्पिंग यार्डवर कचरा साठून राहत होता. त्यापासून वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होऊन अनेक आजारांची शक्यता निर्माण झाली होती. या समस्यांपासून मुक्ती मिळविण्याकरिता मुक्ती फाऊंडेशन व सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कने प्रयत्न केले. यावेळी आयुक्त संजय काकडे, यांनी प्रकल्पाची उपयोगिता समजावून सांगितली.
प्राचार्य डॉ.सुनील साकुरे, मंजुश्री कासनगोट्टूवार, नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया उईके, शीला चव्हाण, प्रा. विश्वनाथ राठोड यांनी घनकचºयाच्या वर्गिकरणाबाबत माहिती दिली संचालन प्रज्ञा गंधेवार यांनी केले. शहरातील नागरिकांनी या प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संजय काकडे यांनी केले. मंजुश्री कासनगोट्टूवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर राईच, सभापती माया मांदाडे, प्रा. बोरकुटे, वसंतराव धंदरे, आमिन शेख, विजय चिताडे, गजानन भोयर, प्रा.संजय गवळी, विजय नळे, पुरुषोत्तम सहारे, आशा देउळकर, शिल्पा कांबळे, गुंडावार व मुख्य भूमिका असणारे समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, मुक्ती फाऊंडेशनचे कार्यकर्ते, स्पार्टन्स संस्थेचे अध्यक्ष सुयोग खटी उपस्थित होते.