वरोरा शहरातील अनेक बँकांना पार्किंगच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:27 AM2021-03-06T04:27:28+5:302021-03-06T04:27:28+5:30
वरोरा शहरात राष्ट्रीय, राज्यस्तरीय बँक, जिल्हा बँक तसेच अनेक पतसंस्था मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत. बँकांची शाखा सुरू ...
वरोरा शहरात राष्ट्रीय, राज्यस्तरीय बँक, जिल्हा बँक तसेच अनेक पतसंस्था मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत. बँकांची शाखा सुरू करताना येणाऱ्या ग्राहकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो, याची शहानिशा करून बँकेची शाखा उघडली जाते. परंतु बँक शाखा उघडण्याची स्पर्धा वरोरा शहरात मागील काही दिवसापासून सुरू झाली असल्याचे दिसून येते. या स्पर्धेत ग्राहकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे मानले जात आहे. वरोरा शहरातील अनेक बँकांसमोर पार्किंग व्यवस्था नसल्याने बँकेत येणारे ग्राहक दुचाकी, चारचाकी व ऑटोने येत असतात. पार्किंग व्यवस्थाच नसल्याने ते आपले वाहन रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे करतात, तर काही वाहने रस्त्यावर उभी केली जातात. रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची धडक या उभ्या असलेल्या बँक ग्राहकांच्या वाहनांना लागते. त्यात वाहन दुरुस्तीचा भुर्दंड बँक ग्राहकांना बसतो. परिणामी, दुकानासमोर वाहन उभे करताना दुकानदार व ग्राहकांमध्ये अनेकदा बाचाबाची तर कधी हाणामारी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन ज्या बँकांना पार्किंग नाही, अशा बँकांना पार्किंग सुविधा करण्याकरिता बाध्य करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.