मुदत संपूनही अनेकांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:00 AM2021-09-02T05:00:25+5:302021-09-02T05:00:25+5:30
जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर ...
जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी देत होती. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला. बºयाच केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आपल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांचीही संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीबाबतही काही गैरसमज पसरविण्यात आले होते. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच लसीकरण केंद्रांवर जागृतीचे बॅनर लावणे, घरोघरी भेटी देऊन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही केवळ हलगर्जीपणामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
बॉक्स
दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यक
दोन्ही कोविड डोस संसर्गापासून बचाव करतात. प्रथम डोस प्रभावीच आहे. पण, दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोस शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक प्रकार आहे.
बॉक्स
नेमकी अडचण काय?
दुसरा डोस घेतल्यास आतील रिसेप्टर्स व्हायरसने शरीरात प्रवेश करताच सिस्टमला सतर्क करतात व कोविड संक्रमणापासून वाचवतात, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून सतत सांगितली जात आहे. पण, निष्काळजीपणा व केंद्रात जाऊन एक-दोनदा परत आल्याने आलेली नकारात्मकता, आदी कारणे दुसरा डोस घेण्यास अडचणी निर्माण करीत आहेत.
बॉक्स
पहिला घेतल्यास दुसरा डोस मिळतोच
दुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. पण दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळतोच, असा दावा प्रशासनाने केला आहे.