अनेकांनी केला आरोग्यसेतू अॅप डाॅऊनलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:53+5:302021-02-27T04:37:53+5:30
रेडियमअभावी अपघाताची शक्यता जिवती : तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या ...
रेडियमअभावी अपघाताची शक्यता
जिवती : तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, अशी मागणी सहयोगी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
शेकडो ग्राहक त्रस्त
कोरपना : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकामध्येही हिच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.
मजुरांमध्ये पसरले नैराश्य
चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामाच्या माध्यमातून नोंदणीकृत मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाते. यातून रोजगार प्राप्त होत असतो. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर अनेक कामे बंद आहे. परिणामी जिल्ह्यातील शेकडो मजूर रिकाम्या हाताने आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे.
मोकाट जनावरांमुळे पिकांची नासाडी
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील काही गावांमध्ये सिंचन सुविधा आहे. त्यामुळे दुबार पिक घेतल्या जाते. विविध रोगांच्या प्रादूर्भावापासून शेतकरी कसेबसे आपल्या पिकांचे संरक्षण करीत आहेत. मात्र मोकाट जनावरांमुळे पीके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
वीज ग्राहकांना त्रास
चिमूर : तालुक्यातील काही गावांमध्ये विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर विजेचा कमी अधिक दाब असतो. काही वेळा एका फेजची वीज राहत नाही. नागरिकांनी वीज कंपनीकडे तक्रार केली आहे. मात्र कुणी लक्ष द्यायला तयार नसल्याने ग्राहकांत रोष आहे.
पळसगाव येथील
पुलाची उंची वाढवा
चिमूर : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या काही गावातील नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून दिलासा देण्याची मागणी केली जात
आहे.