अनेक रस्त्यावर अंतर व दिशादर्शक फलकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:53+5:302021-08-29T04:27:53+5:30

गडचांदूर ते राज्य सीमा, भोयगाव ते गडचांदूर, कन्हाळगाव ते मांडवा, येरगव्हाण ते हातलोणीदरम्यान गडचांदूर वगळता एकाही गावाचे फलक नाही. ...

Many roads do not have distance and directional signs | अनेक रस्त्यावर अंतर व दिशादर्शक फलकच नाही

अनेक रस्त्यावर अंतर व दिशादर्शक फलकच नाही

Next

गडचांदूर ते राज्य सीमा, भोयगाव ते गडचांदूर, कन्हाळगाव ते मांडवा, येरगव्हाण ते हातलोणीदरम्यान गडचांदूर वगळता एकाही गावाचे फलक नाही. तसेच भोयगाव - कवठाळा मार्गावरील बोढे होमिओपॅथी क्लिनिकजवळील टी पॉइंट, वनसडी - भोयगाव मार्गावरील इरई चौपाटी, दालमिया सिमेंट चौपाटी, बोरी नवेगाव फाटा, वनसडीजवळील नारंडा फाटा, कोरपना - वणी मार्गावरील तुकडोजीनगर टी पॉइंट, कोडशी बू मार्गावरील गांधीनगर फाटा, परसोडा मार्गावरील रायपूर फाटा, आदिलाबाद मार्गावरील दुर्गाडी फाटा, टांगला फाटा ते रूपापेठ मार्गावरील जांभूळधरा फाटा, मांगलहिरा चौपाटी, थिपा हनुमानगुडा टी पॉईंट, कोरपना बसस्थानक परिसर, कातलाबोडी - कोरपना मार्गावरील हातलोणी व बोरगाव फाटा या स्थानी दिशादर्शक व अंतर फलक नाही. परिणामी नवीन व्यक्तींना त्या स्थानी कोणता मार्ग कुठे जातो, याबद्दल माहिती मिळत नाही. यात त्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य व जिल्हा सीमेवरही सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे सीमा कुठून सुरू होते. हे सुद्धा कळायला मार्ग नाही. या अनुषंगाने बांधकाम विभागाने फलके लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Many roads do not have distance and directional signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.