नादुरूस्त बसमुळे अनेक फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:45 PM2018-09-08T22:45:27+5:302018-09-08T22:45:55+5:30

राजुरा आगारातील बस वेळेवर सोडल्या जात नाही. ऐन वेळी रद्द केल्या जात असल्यामुळे कोरपना, राजुरा व जिवती तालुक्यातील विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. या आगाराला जादा बसेसशिवाय पर्याय नाही. अन्यथा अवैध प्रवासी वाहतुकीला जोर येण्याचा धोका आहे.

Many trips canceled because of unavoidable buses | नादुरूस्त बसमुळे अनेक फेऱ्या रद्द

नादुरूस्त बसमुळे अनेक फेऱ्या रद्द

Next
ठळक मुद्देविद्यार्थी, प्रवाशांचे हाल : राजुरा आगाराला द्या जादा बसेस

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : राजुरा आगारातील बस वेळेवर सोडल्या जात नाही. ऐन वेळी रद्द केल्या जात असल्यामुळे कोरपना, राजुरा व जिवती तालुक्यातील विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. या आगाराला जादा बसेसशिवाय पर्याय नाही. अन्यथा अवैध प्रवासी वाहतुकीला जोर येण्याचा धोका आहे.
राजुरा आगाराकडे केवळ ६७ बसेस उपलब्ध आहेत. त्यापैकी दररोज चार-पाच बसेस पासिंगकरिता पाठविण्यात येतात. काही बसेस नादुरुस्त असून गॅरेजमध्येच ठेवल्या जातात. त्यामुळे १० ते १२ बसेस कमी पडतात. बसेसच्या कमतरतेमुळे अनेक फेºया रद्द कराव्या लागत आहेत. लोणी, वनसडी, नारंडा, कोरपना, आसन (बु.), गेडामगुडा, नवेगाव, कढोली, वडगाव, खिर्डी, इंजापूर, धामणगाव, नैतामगुडा, नांदा, बिबी, सांगोडा, निमणी, बाखर्डी, कवठाळा, उपरवाही, हरदोना, कुकुडसात, लखमापूर व तळोधी येथील शेकडो विद्यार्थी गडचांदूर येथे शिक्षण घेण्याकरिता येतात. पण दिवसभर ताटकळत राहावे लागते. त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.
वाहकांची ३३ पदे रिक्त
राजुरा आगारात १३६ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत १०३ वाहक कार्यरत आहेत. ३३ वाहकांच्या जागा रिंक्त आहेत. आगारातील १७ बसेसने दहा लाखांपेक्षा जास्त किलोमीटर अंतराचा प्रवास पूर्ण केला. अशा बसेस रद्द करण्याचा नियम आहे. पण प्रशासनाने यावर अद्याप कार्यवाही केली नाही. बस दुरुस्ती करणारे कारागीरही नाहीत. २५ ते ३० कारागिरांचे काम केवळ दोन कारागीर सांभाळतात.

एक महिन्यापासून आगारातील डिझेल पंप बंद होते. त्यामुळे गडचांदूरपर्यंत २० किमी धावायचे असल्यास ६० किमी अंतरावरील चंद्रपुरातून डिझेल टाकून गडचांदूरला परत यावे लागत होते. पण ही समस्या दूर झाली. आगारातील अन्य अडचणींचाही लवकरच निपटारा होणार आहे.
-आशिष मेश्राम, आगारप्रमुख राजुरा

Web Title: Many trips canceled because of unavoidable buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.