ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना अद्यापही घरकुलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:51 PM2017-11-11T23:51:26+5:302017-11-11T23:51:42+5:30

सामाजिक, आर्थिक व जात जनगणना आधारावर केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील अनेक गावांना अजूनही घरकुलाची गरज आहे.

Many villages in Brahmapuri taluka still need a hut | ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना अद्यापही घरकुलाची गरज

ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना अद्यापही घरकुलाची गरज

Next
ठळक मुद्देनागरिकांची अपेक्षा : प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करावा

रवी रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : सामाजिक, आर्थिक व जात जनगणना आधारावर केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील अनेक गावांना अजूनही घरकुलाची गरज आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना सामावून घरकूलचे उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यात २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५७० घरकुलांना मंजुरी मिळाली असून सद्य:स्थितीत ५६७ घरकुलचे काम प्रगतिपथावर असल्याने तालुक्याची उद्दिष्ट्य पुर्तीकडे वाटचाल सुरू आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात ११० गावे असून ७५ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. रमाई घरकूल योजना, इंदिरा आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुक्यात घरकूलची कामे सुरू आहेत. रमाई घरकूल योजनेत ११५ लाभार्थ्यांना पहिला हप्ता तर ७८ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला. इंदिरा आवास योजनेमध्ये २२५ घरांचे उद्दिष्ट्य असून २२३ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला. परिणामी, १५३ घरकूल पूर्ण झाले आहते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५७० उद्दिष्ठ असून ५६७ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला. तालुक्यात ६ हजार घरकुलांचे घटक असून त्यापैकी आतापर्यंत जवळजवळ सुमारे १ हजार लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले. तर अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. लाभार्थ्यांनी अनुदान मिळूनही कामे अपूर्ण ठेवल्याने उर्वरीत निधी जैसे थे स्वरूपात असल्याने प्रशासन या लाभार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे. तालुक्यातील मेंडकी, गांगलवाडी, कढाली, अºहेरनवरगाव, चिचखेडा आदी गावांनी घरकुलाच्या संख्येत भर टाकली आहे. तर बेटाळा, बोढेगाव, दिघोरी, एकारा, किटाली, कोखुळना आदी गावे घरकूल योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.

Web Title: Many villages in Brahmapuri taluka still need a hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.