मराठी मुलीची केरळमध्ये कमाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:29 AM2021-07-30T04:29:39+5:302021-07-30T04:29:39+5:30

बारावीत पटकाविले ९८ टक्के गुण चंद्रपूर : जिद्द आणि परिश्रम असतील तर अशक्य काहीच नाही. मराठी मुलीने आपल्या खेड्यापासून ...

Marathi girl's maximum in Kerala! | मराठी मुलीची केरळमध्ये कमाल !

मराठी मुलीची केरळमध्ये कमाल !

Next

बारावीत पटकाविले ९८ टक्के गुण

चंद्रपूर : जिद्द आणि परिश्रम असतील तर अशक्य काहीच नाही. मराठी मुलीने आपल्या खेड्यापासून तब्बल दीड हजार किलोमीटर अंतरावरील केरळमध्ये सहा वर्षे शिक्षण घेतले आणि बारावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेऊन महाराष्ट्राचा लौकिक वाढविला आहे. ही कमाल केली आहे, आदिवासीबहुल कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव या खेड्यातील तुरीया शंकर तडस हिने.

केरळचे शिक्षण उत्तम असते आणि तेथे वसतिगृहाची व्यवस्था असल्यामुळे तुरीयाने सातवीपासून तिथे शिक्षण घेण्याचे आव्हान स्वीकारले. देशातील सर्वात कठीण समजली जाणारी मल्याळम भाषा. ही भाषा अवगत करणे मोठेच आव्हान होते. मात्र, पर्यायच नव्हता. संस्कृती, आहार आणि वातावरण अगदीच भिन्न असल्यामुळे सुरुवातीचे दिवस थोडे कठीण गेले. नंतर सहा वर्षे कसे गेले कळलेच नाही.

थ्रिसूर हे जिल्ह्याचे ठिकाण. येथे सारदा मठाच्या वतीने १०० मुलींचे वसतिगृह आणि शाळा चालविली जाते, अशी माहिती इंटरनेटवरून मिळाली. शाळेत प्रवेशही मिळाला. तुरीयाने कठोर परिश्रम घेत बारावीच्या परीक्षेत तब्बल ९८ टक्के गुण घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे.

Web Title: Marathi girl's maximum in Kerala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.