ब्रम्हपुरी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:25 AM2021-01-22T04:25:26+5:302021-01-22T04:25:26+5:30
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) मा. गो. मोरे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. जगदीश मेश्राम, ...
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) मा. गो. मोरे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. जगदीश मेश्राम, विधिज्ञ संघाचे अध्यक्ष हेमंत उरकुडे आणि ज्येष्ठ अधिवक्ता पी. आर. पाथोडे मंचावर उपस्थित होते. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून देत संत साहित्याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले; तर ॲड. हेमंत उरकुडे यांनी कार्यालयीन कामकाज करताना मराठी भाषेचा उपयोग करण्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. जी. मोरे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करावा, जेणेकरून मराठी अस्मिता टिकून राहील, असे सांगितले.
यावेळी न्यायालयाचे सहायक अधीक्षक एम. जी चांभारे यांच्याहस्ते न्यायालयातील कनिष्ठ लिपिक एच. जी. खोब्रागडे व पी. एम. दशसहस्र यांची वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा फळझाडे देऊन सत्कार करण्यात आला.
ॲड. आशिष गोंडाने यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला तालुका विधिज्ञ संघाचे छबी गोहणे, शरयु देवीकर तसेच न्यायालयाचे सहायक अधीक्षक बी. यु. कपाटे यांच्यासमवेत न्यायालयीन कर्मचारी संघप्रिया रामटेके (वरिष्ठ लिपिक), एन. एस. बनकर (वरिष्ठ लिपिक), साबेर काझी, आशिष रामटेके, प्रशांत वालदे, पंकज कोल्हे, अंकुश मावस्कर, अजय जिभकाटे, नरेश पेंदोर, प्रियंका डोंगरे, सचिन रणदिवे आदी उपस्थित होते.