न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:01+5:302021-02-07T04:26:01+5:30
चंद्रपूर : न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे दावे व अर्ज मराठी भाषेत करण्यास उपयुक्त होईल, ...
चंद्रपूर : न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे दावे व अर्ज मराठी भाषेत करण्यास उपयुक्त होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले.
चंद्रपूर जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला डॉ.प्रशांत आर्वे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.शरद आंबटकर, जिल्हा व सत्र न्यायधीश वीरेंद्र केदार, एस.जे. अन्सारी, प्रभाकर मोडक, के.पी. श्रीखंडे, श्रीधर मौदेकर, अनुराग दीक्षित आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.प्रशांत आर्वे म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेचा दैनंदिन, व्यावहारिक वापर वाढला पाहिजे, असे प्रतिपादन केले, तर जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.शरद आंबटकर यांनी दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीतजास्त वापर करून भाषा संवर्धनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव यांनी केले. यावेळी न्यायालयात नेहमीच्या वापराच्या सुमारे ५० कायद्यांच्या मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकांचे व दोन शब्दकोशांचे वितरण करण्यात आले.