बाजार भरतो रस्त्यावर, कचरा ओट्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:26+5:302021-08-20T04:32:26+5:30
सिंदेवाही : शहरातील गांधी चौक परिसरात कचरा व सडका भाजीपाला बाजारातील भाजी विक्रेता ओट्यावर टाकत असून स्वच्छतेच्या अभियानाचा बोजवारा ...
सिंदेवाही : शहरातील गांधी चौक परिसरात कचरा व सडका भाजीपाला बाजारातील भाजी विक्रेता ओट्यावर टाकत असून स्वच्छतेच्या अभियानाचा बोजवारा उडत असल्याचे पहावयास मिळत आहे.
बाजार चौक येथे भाजी विक्रेत्यांसाठी बाजारात ओटे केले आहेत. बाजारातील ओट्यावर नगरपंचायतचे टीन शेडचे काम अर्धवट असल्यामुळे भाजी विक्रेते भाजीपाला रस्त्यावर विक्री करीत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. भाजी विक्रेते बाजारातील ओट्यावर भाजीपाल्याचा कचरा टाकत आहेत. पावसाळ्यात परिसरात चिखलाचे साम्राज्य, सडका व घाणेरडा वास येत असल्याचे डासांचा त्रास आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर गाई, बैल, कुत्रे यांचा त्रास वाढलेला आहे. नगरपंचायतद्वारे कचरा गाडी ठेवण्यात आली होती. परंतु काही लोक कचरा बाहेर टाकत असतात. नगरपंचायतद्वारे भाजी विक्रेत्यांनी कचरा टाकल्यास दंड आकारण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.