जिल्ह्यात दोन वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:31+5:302021-06-03T04:20:31+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व बाजारपेठेच्या ठिकाणी सर्व दुकाने सकाळी ७ ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व बाजारपेठेच्या ठिकाणी सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
राज्यभर १ जून ते १५ जून या कालावधीकरिता लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाचा अतिप्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांकरिता लॉकडाऊन काळात सर्वप्रकारची दुकाने अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्तची सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. लॉकडाऊनमुळे न्हावी, शिंपी, चांभार, कुंभार, हातगाडीवाले, छोटे व्यापारी, इलेक्ट्रॉनिक्स, कपड्याचे व हार्डवेअर दुकानदार तसेच बांधकाम मजूर आर्थिक संकटात आलेले आहेत. व्यापक जनहित लक्षात घेता, आवश्यक सेवाव्यतिरिक्तची सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळात सुरू ठेवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किशोर दहेकर, विभागीय सचिव मितीन भागवत, अनिल दिकोंडवार, ईश्वर सहारे, सुदाम राठोड, आनंद अंगलवार, योगेश मुरेकर आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना भेटून मागणीचे निवेदन दिले.