जातीचा अडसर दूर करून तंटामुक्त समितीने लावला प्रेमीयुगुलाचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:25 AM2021-02-14T04:25:56+5:302021-02-14T04:25:56+5:30
सास्ती येथील भारत नागेश्वर गज्जमवार(२६) व अलेक्या रायनर्सू गोसकी (२२) या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. रोज एकमेकांची गाठभेट होत असल्याने ...
सास्ती येथील भारत नागेश्वर गज्जमवार(२६) व अलेक्या रायनर्सू गोसकी (२२) या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. रोज एकमेकांची गाठभेट होत असल्याने त्यांचे प्रेम अधिकच बहरले. प्रेमाच्या आणाभाका सुरू झाल्या. दोघेही आंतरजातीय असल्याने लग्न करायला जात आडवी आली. तंटामुक्त समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुलाकडील व मुलीकडील घरच्यांची समजूत काढली. दोघांच्याही घरातील मंडळींनी या दोघांच्या आंतरजातीय विवाहाला परवानगी दिल्याने अखेर सास्ती येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश भटारकर, सरपंच रमेश पेटकर, ग्राम विकास अधिकारी उमेश आकुलवार, तिरुपती चिंतला, रवी दुवासी, विलास भटारकर सर्व ग्रा.पं. कर्मचारी यांच्या व गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रेमीयुगुलाचा आंतरजातीय विवाह सास्ती येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. यावेळी तंटामुक्त समितीने विवाहबंधनात अडकलेल्या नवविवाहित प्रेमीयुगुलाला संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले.