अपंगत्वावर मात करून अमरावतीचा ‘मंगल’ करतो चंद्रपुरात मजुरीचे काम

By admin | Published: April 12, 2017 12:56 AM2017-04-12T00:56:48+5:302017-04-12T00:56:48+5:30

एकीकडे आकाशाला टेकणाऱ्या अशा टोलेजंग इमारती आपल्या देशात उभ्या आहेत.

Marrying Amravati by overcoming the disability and labor work in Chandrapur | अपंगत्वावर मात करून अमरावतीचा ‘मंगल’ करतो चंद्रपुरात मजुरीचे काम

अपंगत्वावर मात करून अमरावतीचा ‘मंगल’ करतो चंद्रपुरात मजुरीचे काम

Next

पोटासाठी राबतो रखत्या रखत्या उन्हात : घरात अठराविश्व दारिद्र्य
शशिकांत गणवीर भेजगाव
एकीकडे आकाशाला टेकणाऱ्या अशा टोलेजंग इमारती आपल्या देशात उभ्या आहेत. समाजात उच्चभ्रु असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी लग्नसमारंभा सारख्या कार्यक्रमात, धार्मीक कार्यक्रमात करोडो रुपयाचा खर्च होताना दिसते आहे. मात्र दुसरीकडे दोनवेळच्या जेवनाची भ्रांत पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. पोटाची खळगी भरण्याकरिता प्रत्येकाला काम करावे लागते. त्यात आपल्या कुवतीनुसार कामाचा दर्जा ठरत असतो. मात्र एका पायानी अपंग असुनही संसाराचा गाडा चालविण्याकरिता, मिळेल ते मजुरीचे काम काठीच्या आधारावर मंगल हा युवक करीत आहे.
मंगल हिरालाल भाष्कर (३५) हा युवक अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्यातील कोडापाटी येथील रहिवासी आहे. सध्या तो कामाच्या शोधात महिनाभरापासून मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात वास्तव्यास आहे. उमा नदीवर मोठ्या पुलाची निर्मीती झाली आहे. या ठिकाणी रोड रूंदीकरणाच्या कामावर काठीच्या आधाराने अपंग मंगल पत्नी सोबत काळी गिट्टी टाकण्याचे काम करीत आहे. मंगल भुमिहीन असून घरी अठराविश्व दारिद्रय असल्याने घरची परिस्थिती हलाखीची आहे. यातच वयाच्या पाचव्या वर्षीच पोलिओ झाल्याने वेळेवर उपचार होऊ शकला नाही. मंगल हा भुमिहीन शेतमजुर असला तरी शासनाच्या कोणताही योजनेचा लाभ त्याला मिळात नाही. तो मुळगावी कोडापाटी येथे कुडामातीच्या झोपडीत वास्तव करतो. मंगलला घरकुलाची नितांत गरज असतानाही मंगलला राजकिय द्वेशातुन डावलले जात असल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
शरीराने व्यंगत्व असले तरी, हार न मानता व कोणताही अवैध धंदा न करता रखरखत्या उन्हात मंगल आपल्या परिवाराचा गाडा रेटण्यासाठी राब-राब राबतो आहे. असे असले तरी मंगलने आतापर्यंत कोणतेही शासकिय अनुदान घेतले नाही. मंगलला गावात शासनाने हक्काचा निवाऱ्यासाठी घरकुल द्यावे व अपंगासाठी असलेले शासकीय अनुदान पाठीमागे उभे रहावे, अशी मागणी मंगलने केली आहे.

Web Title: Marrying Amravati by overcoming the disability and labor work in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.