मासळ बु. येथून कृषी संजीवनी मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:54+5:302021-06-22T04:19:54+5:30
कृषी मोहिमेंतर्गत कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना पिकांची लागवड, खतांचा वापर, बीज प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले. ...
कृषी मोहिमेंतर्गत कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना पिकांची लागवड, खतांचा वापर, बीज प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी मंडळ अधिकारी गजानन भोयर यांनी रोगावरील बुरशीनाशक रोग, धानाची लागवड कशी, तुरीची लागवड, सोयाबीन, कापूस यांवरील संभाव्य येणारे रोग या विषयावर मार्गदर्शन केले. या मोहिमेचा समारोप १ जुलैला कृषिदिनी होणार आहे. कार्यक्रमाला ग्रामपंचायत मासळ बु.चे सरपंच विकास धारणे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, मंडळ कृषी अधिकारी गजानन भोयर, कृषी सहायक गौतम टेंभूर्णे, कृषिसेवक बळीराम येवले, माजी सरपंच विनोद मोडक, नितेश गणवीर आदी शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
210621\img_20210621_114646.jpg
===Caption===
कृषी संजीवनी मोहीमेदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ज्ञानदेव तिखे तालुका कृषी अधिकारी चिमुर व उपस्थित शेतकरी वर्ग