सुगंधित तंबाखूचे सूत्रधार मोकळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:52+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात काही विक्रेत्यांकडून खर्रा विकला जात आहे. सुगंधित तंबाखू आणि त्यापासून बनविलेल्या खर्रा विक्रीवर राज्य शासनाने आधीच बंदी घातली आहे. तरीही खर्रा दुकाने ठिकठिकाणी लागलेली होती. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू केली. या संधीचा फायदा सुगंधित तंबाखूच्या तस्करांनी साठेबाजी करून लाटणे सुरू केले आहे.

The master of fragrant tobacco is free | सुगंधित तंबाखूचे सूत्रधार मोकळेच

सुगंधित तंबाखूचे सूत्रधार मोकळेच

googlenewsNext
ठळक मुद्देविभाग म्हणतो, १५ तालुक्यांसाठी तीनच अन्न सुरक्षा अधिकारी

राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या सुगंधित तंबाखूच्या काळाबाजाराची काळीगाथा ‘लोकमत’ने उजागर करताच या तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले असल्याची या व्यवसायात काम करणाऱ्या सूत्रांचे म्हणणे आहे. अन्न व औषध प्रशासनाने हात वर केले असून पोलीस प्रशासन कारवाया करीत आहे. मात्र या कारवायातून मुख्य सूत्रधारालाच पद्धतशीर बाजुला सुरक्षित ठेवले जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्राने दिली. केलेल्या कारवाईत जप्त केलेला सुगंधित तंबाखू नेमका कुठून आला याचा सखोल तपास केल्यास हा काळाबाजार संपुष्टात येईल, असेही सूत्राचे सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात खर्रा शौकिनांची तलब आजही सहज भागत आहे. लॉकडाऊनपूर्वी १० रुपयाला मिळणारा खर्रा आता २० रुपयांपासून तर ५० रुपयांपर्यंत भाव खातो आहे. यात शौकिनांची लुट तर आलीच शिवाय त्याला नामांकित तंबाखूच्या नावावर डुप्लिकेट तंबाखूचा खर्रा दिला जात आहे. ही बाब खर्रा शौकिनांच्या जीवाशी खेळणारी आहे. हा खेळ बंद करणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आवाक्याबाहेर असल्याचे खुद्द या विभागाचे म्हणणे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात काही विक्रेत्यांकडून खर्रा विकला जात आहे. सुगंधित तंबाखू आणि त्यापासून बनविलेल्या खर्रा विक्रीवर राज्य शासनाने आधीच बंदी घातली आहे. तरीही खर्रा दुकाने ठिकठिकाणी लागलेली होती. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू केली. या संधीचा फायदा सुगंधित तंबाखूच्या तस्करांनी साठेबाजी करून लाटणे सुरू केले आहे. तंबाखूचा शार्टेज दर्शवून २०० ग्रॅम तंबाखूचा दर ८०० रुपयांवरून थेट २५०० आणि आता तो ३३०० रुपयांवर नेला असल्याचे खर्रा विक्रेता सांगतो. काही विक्रेत्यांनी आपल्या ग्राहकांची तलब पूर्ण करण्यासाठी छुप्या मार्गाने खर्रा विक्री सुरू केली. यामुळे तंबाखू साठेबाजांचे चांगलेच फावत आहे. या तस्करांवर आळा घालण्याची जबाबदारी आहे ती अन्न व औषध प्रशासन विभागाची. मात्र विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी अपुºया मनुष्यबळाचे कारण पुढे करून अप्रत्यक्षपणे आपली हतबलता ‘लोकमत’पुढे मांडली. या विभागाच्या मदतीला पोलीस प्रशासन कारवाईसाठी सोबतीला असले तरी मुख्य सूत्रधाराचा शोध सोडून केवळ कारवाया दाखविण्यावरच भर दिला जात असल्याचे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ लाख ८ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त केला.

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहेत. या तालुक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वा सुगंधित तंबाखूबाबतच्या कारवाया करण्यासाठी मनुष्यबळ अपुरा पडतो. सहाय्यक आयुक्त आणि तीन अन्न सुरक्षा अधिकारी असे चारच जण आहे. पुन्हा दोन अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांची नितांत गरज असून तसा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविलेला आहे. काही लोक खºर्याच्या किमती ८०, १०० रुपयांपर्यंत वाढल्याच्या तक्रारी फोनद्वारे करतात. त्यांनी खर्राच खाऊ नये. खर्राच खाल्ला नाही तर आपोआप बंद होईल.
- नितीन मोहिते, सहाय्यक आयुक्त, अन्न व सुरक्षा प्रशासन, चंद्रपूर.
 

Web Title: The master of fragrant tobacco is free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.