शिक्षक संख्येचे गणित बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:07+5:302021-07-28T04:29:07+5:30
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण विभाग मागील काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्याचा चांगला परिणामही जिल्ह्यात दिसून आला आहे. मात्र, ...
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण विभाग मागील काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्याचा चांगला परिणामही जिल्ह्यात दिसून आला आहे. मात्र, कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात संचमान्यता झाली नसल्यामुळे शाळांमधील शिक्षक संख्या तसेच अतिरिक्त शिक्षकांचे गणित सध्या बिघडले आहे. एकीकडे अतिरिक्त शिक्षक, तर दुसरीकडे रिक्त पदे असे काहीसे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने संचमान्यता करावी, तसेच पदोन्नतीतून उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांच्या
जागा भरणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, रिक्त असलेल्या मुख्याध्यापकांचा प्रभार अन्य शिक्षकांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे त्या शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
बाॅक्स
विद्यार्थ्यांचे नुकसान
जिल्ह्यात शिक्षण विभागामध्ये मोठ्या संख्येने पदेे रिक्त आहेत. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचीही पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभार विस्तार अधिकाऱ्यांकडे आहे.
कोट
सत्राच्या सुरुवातीला समायोजन होणे आवश्यक आहे. मात्र, अर्धे सत्र निघून जाते. तरीही जागा रिक्तच राहतात. त्यामुळे शैक्षणिक प्रक्रियेला बाधा निर्माण होते. सेवानिवृत्त, मृत्यू व अन्य कारणांनी जागा रिक्त झालेल्या आहेत. त्या समायोजन व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेने लवकर भरण्यात याव्यात, अशी संघटनेची मागणी आहे.
हरीश ससनकर
राज्य सरचिटणीस
पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती
कोट
मागील काही वर्षांपासून संचमान्यता झाली नाही.
संचमान्यता त्वरित घेणे गरजेचे आहे. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या आणि केंद्रप्रमुखांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. रिक्त असलेल्या ठिकाणी प्रभार अन्य शिक्षकांकडे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांची रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.
- जे. डी. पोटे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक पती-पत्नी सेवा संघ, चंद्रपूर