वरोऱ्याचा मयूर कहुरके जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दोन-तीन शाळांचा अपवाद वगळला तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दोन-तीन शाळांचा अपवाद वगळला तर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. वरोरा येथील सेंट अॅन्स पब्लिक स्कूल, द्वारकानगरीचा मयूर गजानन कहुरके हा ९८.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आला आहे.
याच शाळेतील प्रणव संजय भसाखेत्रे हा ९८.२ टक्के गुण घेत द्वितीय आला आहे. तर बीजेएम कार्मेल अकादमीचा वेदांग कांबळे व वरोरा येथील सेंट अॅन्स पब्लिक स्कूल, द्वारकानगरीची श्रुती प्रशांत माडूरवार हे दोघेही ९८ टक्के गुण घेत संयुक्तपणे जिल्ह्यात तृतीयस्थानी आले आहेत.
सीबीएसई बोर्डाचा दहावी निकाल बुधवारी जाहीर होणार असल्याचे मंगळवारी सांगण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. त्यामुळे बुधवारी निकाल जाहीर होताच अनेक विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये जाऊन तर काहींनी आपल्या पालकांच्या मोबाईलवरून निकाल बघितला. चंद्रपुरातील श्री महर्षी विद्या मंदिर, नारायणा विद्यालयम, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, बिजेएम कार्मेल अकादमी, विद्या निकेतन, सेंट मायकल इंग्लिश स्कूल, चांदा पब्लिक स्कूल, आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपूर, सेंट अॅन्स पब्लिक स्कूल, द्वारकानगरी, वरोरा, केंद्रीय विद्यालय, चांदा आयुधनिर्माणी, मोंट फोर्ट हायर सेकंडरी स्कूल, बामणी, बल्लारपूर, विद्या निकेतन स्कूल, ब्रह्मपुरी, फेअरलॅन्ड स्कूल, गवराळा, भद्रावती, दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूर आदी शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे.
६५ टक्के विद्यार्थी डिस्टींक्शन श्रेणीत
बुधवारी जाहीर झालेल्या सीबीएसई दहावी निकालात काही अपवाद वगळता सर्वच शाळांनी शंभर टक्के निकाल दिला. विशेष म्हणजे, उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांमध्ये सुमारे ६५ टक्के विद्यार्थी डिस्टींक्शन श्रेणीत आले आहेत. ही बाब जिल्ह्यासाठी गौरवाची ठरली आहे.