माजरी पोलिसांनी केली २१ लाखांची अवैध दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:25 AM2021-02-08T04:25:00+5:302021-02-08T04:25:00+5:30
माजरी : यवतमाळ व इतर जिल्हा आणि तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या ...
माजरी : यवतमाळ व इतर जिल्हा आणि तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या तस्करांवर कारवाई करून पोलीस मोठ्या प्रमाणात दारू जप्त करतात. यातील काही प्रकरणे न्यायालयाने निकाली काढल्याने न्यायालयाच्या आदेशाने माजरी पोलिसांनी २० लाख ८६ हजार ६०० रुपयांची दारू नष्ट केली.
माजरी पोलीस ठाण्यांकडून आजपर्यंत अनेक अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखोंची दारू जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी भद्रावतीच्या न्यायालयात अनेक प्रकरणे सुरू होते. न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांपैकी १३६ प्रकरणांचा न्यायालयाने निकाल लावला. माजरी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे माजरीच्या ठाण्यात जप्त असलेल्या देशी-विदेशी दारूच्या बाॅटल्स असा एकूण २० लाख ८६ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा गुरुवारी माजरी पोलिसांनी रोडरोलरच्या मदतीने नष्ट करून तो जमिनीत गाडण्यात आला. यावेळी माजरीचे ठाणेदार विनीत घागे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.