महिनाभरात माजरीवासीयांना मिळणार वीज : ऊर्जा राज्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:59+5:302021-06-06T04:21:59+5:30
मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजरी रेल्वे स्थानकला जाऊन कोळसा वॅगनची पाहणी केली. माजरी रेल्वे स्थानक मास्टरला कोळसा तपासणी ...
मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजरी रेल्वे स्थानकला जाऊन कोळसा वॅगनची पाहणी केली. माजरी रेल्वे स्थानक मास्टरला कोळसा तपासणी प्रयोगशाळेबाबत विचारणा केली असता कोळसा तपासणी प्रयोग शाळाच नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर मंत्री तनपुरे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. बाजारात माजरी पोलिस ठाणे आणि आरोग्य विभागच्या वतीने कोविड तपासणी मोहीम सुरू होती. त्या ठिकाणीही भेट दिली. यावेळी माजरीचे ठाणेदार विनित घागी यांच्यासोबत चर्चा केली. वेकोली अधिकारी, महाविरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांचे प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले.
यावेळी मुनाज शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेबीताई उइके, कामगार सेलचे फैयाज शेख, मागासवर्गीय सेलचे सुनील दहेगावकर, अशरफ खान, माजरीचे माजी सरपंच बंडू वनकर, असलम बेग, कामगार नेता व ग्रामपंचायत सदस्य सतीश कुडुदुला, मेहबुब हसन, सुशांत लांडगे उपस्थित होते.
===Photopath===
050621\img-20210604-wa0071.jpg
===Caption===
एक महिन्यात सर्वाना मिळणार माजरी वासीयांना विज - प्राजक्त तनपुरे ऊर्जामंत्री