गरिबांना दहा रुपयात भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:22+5:302021-06-19T04:19:22+5:30
फोटो बल्लारपूर : लॉकडाऊनमध्ये लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे कित्येक कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहेत. गरिबांना त्यांचे घर चालवणे अवघड ...
फोटो
बल्लारपूर : लॉकडाऊनमध्ये लोकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे कित्येक कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहेत. गरिबांना त्यांचे घर चालवणे अवघड झाले असून त्यांच्या पुढे पोटापाण्याचा प्रश्न उभा झाला आहे. त्यांच्या भोजनाचा प्रश्न सोडवण्याकरिता येथील रणरागिनी हिरकणी फाउंडेशन ही महिलांची सेवाभावी संस्था सरसावली आहे.
नाममात्र दहा रुपयांमध्ये भोजन केंद्र या संस्थेने सुरू केले आहेत. येथील नगरपरिषद बचत भवनात रोज सकाळी ११:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत भोजन गरिबांना दिले जात आहेत. लोकसहभागातून ही बहुजन सेवा सुरू असून या सेवा केंद्राचे उद्घाटन सर्व धर्माच्या गुरूंच्या प्रार्थनेने करण्यात आले. प्रतिदिनी निदान २०० गरीब लोकांना भोजन देण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मनिषा कल्लूरवार यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या सदस्य परिश्रम घेत आहेत. रोज वेगवेगळे मेनू भोजनात असतात.