वाढत्या डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:25+5:302021-08-19T04:31:25+5:30

चंद्रपूर : कोरोना नियंत्रणात आला असला तरी जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण ...

Measures should be taken to control the growing dengue | वाढत्या डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करावी

वाढत्या डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करावी

Next

चंद्रपूर : कोरोना नियंत्रणात आला असला तरी जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना काळात परिस्थीती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महापौर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पावसाळा असल्याने शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. गटारी ब्लॉक झाल्याने त्यातील पाणी बाहेर रस्त्यावर वाहताना दिसून येत आहे. कचरा घनकचरा ठिकठिकाणी साचला आहे. यावर आळा घालण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी. सर्व गटारींवर योग्य ती रासायनिक फवारणी करावी, नाल्या-गटारी साफ करावे तसेच डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजस खोब्रागडे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रेमदास बोरकर, महिला जिल्हा अध्यक्ष मृणाल कांबळे, शहर अध्यक्ष सुरेश शंभरकर, लीना खोब्रागडे, अश्विनी खोब्रागडे, अश्विनी आवळे, ज्योती शिवणकर, गीता रामटेके, प्रा. नागसेन वानखेडे, महादेव कांबळे, वामनराव चांद्रिकापुरे, बंडू दुधे, माणिक जुमडे, शुभम शेंडे, दिलीप खाकसे आदींनी केली आहे.

Web Title: Measures should be taken to control the growing dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.