एमईसीएलचा विस्तारित प्रकल्प होणार
By admin | Published: July 1, 2017 12:41 AM2017-07-01T00:41:46+5:302017-07-01T00:41:46+5:30
येथील चंद्रपूर फेरो अलॉय प्रकल्पाच्या (एमईएल) विस्तारीकरणाबाबत भिलाई येथील सेलच्या कार्यालयात बैठक झाली.
सीईओंचे संकेत : भिलाई येथे प्रशासन व कामगार संघटनेची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील चंद्रपूर फेरो अलॉय प्रकल्पाच्या (एमईएल) विस्तारीकरणाबाबत भिलाई येथील सेलच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी विस्तारित प्रकल्पाबाबत भिलाई प्रकल्पाचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि चंद्रपूरच्या महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट कामगार युनियन यांच्यात चर्चा झाली. भविष्यातील गरज लक्षात घेऊन एमईएलचा स्वत:चा वीज प्रकल्प आणि कच्चा माल पुरवठा करणारा प्रकल्प तयार करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
यावेळी स्टिल अथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेडची कंपनी भिलाई स्टिल प्लांटचे मुख्य कार्यपालक अधिकारी एम. रवी यांनी विस्तारीकरणाबाबत पूर्ण मदत करू व याकरिता पैशाची कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले.
सी.एफ.पी. ला(चंद्रपूर फेरो अलॉय प्रकल्प) कच्च्या मालाकरिता स्वत:च्या खाणी नाहीत. स्वत:चा वीज प्रकल्प नाही. विजेची गरज ४५ मेगावॅट आहे. कंपनीमध्ये ४५ एमव्हए क्षमतेच्या तिसऱ्या सबमर्ज्ड आर्क फर्नेसच्या स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कच्चा माल व विजेची गरज जास्तच राहणार आहे. विजेच्या व कच्च्या मालाच्या दरात दिवसेंदिवस होणारी वाढ सीएफपीच्या प्रगतीच्या आड येणारा मुख्य अडथळा ठरणार आहे. त्यावर उपाय म्हणजे कच्च्या मालाकरिता स्वत:च्या खाणी व विजेची गरज पूर्ण करण्याकरिता आवश्यक क्षमतेचा स्वत:चा वीज प्रकल्प असणे गरजेचे आहे. तसेच सीएफपीकडील ४.२ मेगावॅटचा प्रकल्पाला पूवर्वत सुरू करणे आवश्यक आहे. तेव्हाच कंपनीची प्रगती व पर्यावरणाचे संतुलन कायम राखणे शक्य आहे, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आली. त्यावर रवी यांनी सीएफपीचे विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्यामध्ये ४५ मेगावॅट क्षमतेच्या फर्नेसला लवकरात लवकर सुरू करणे व आवश्यक क्षमतेचे विद्युत संयंत्र चंद्रपूर फेरो-अलॉय प्लांटमध्ये लावण्याची सूचना केली. कच्च्या मालाबाबत सेलची योजना असल्याचे तसेच कॉस्ट आॅफ प्रॉडक्शन कमी करण्याबाबत युनियन व लोकल मॅनेजमेटनी मिळून प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य कार्यपालक अधिकारी रवी यांनी दिले. यावेळी संपूर्ण सेलच्या बाबतही माहिती देण्यात आली.
बैठकीला महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट कामगार युनियनशी भिलाई येथे झालेल्या बैठकीमध्ये युनियनचे महासचिव चंद्रशेखर पोडे व कार्याध्यक्ष बी.के. मून सोबत भिलाई स्टिल प्लांटच्या इंटक युनियनचे नेता एन.एन. राव, उपाध्यक्ष नरेश बनकर, सहसचिव दिवाकर मोसमवार व सल्लागार विजय चौहान उपस्थित होते.