वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात रेमडेसिविर उपलब्ध करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:32+5:302021-04-27T04:29:32+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुणालयात कोरोना रुग्णांच्या उपचाराची स्थिती चिंताजनक आहे. कोविड रुग्णांच्या नातेवाइवांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुणालयात कोरोना रुग्णांच्या उपचाराची स्थिती चिंताजनक आहे. कोविड रुग्णांच्या नातेवाइवांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. डॉक्टर्स व नर्सेस रुग्णाच्या जवळ जात नाहीत. दुरूनच रुग्णाला बघतात, रुग्णांना ऑक्सिजन मिळत आहे किंवा नाही याकडे लक्ष दिले जात नाही. रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णाला दिले जात नाही, बाहेरून आणण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाची स्थिती कशी आहे, याची माहिती कुटुंबीयांना दिली जात नाही, असेही आमदार मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. रेमडेसिविर वितरणाची प्रक्रिया सदोष आहे. अन्य औषधांबाबत हीच अवस्था आहे. मनुष्यबळाची कमतरता ही प्रमुख समस्या आहे. रुग्ण मृत पावल्यानंतर ८ ते १० तासांचा कालावधी लोटूनही बेडवरून उचलत नसल्याने अन्य गंभीर रुग्णाला बेड उपलब्ध होण्यास विलंब होतो. त्यामुळे रुग्णांच्या मदतीच्या दृष्टीने एक जनसंपर्क अधिकारी नेमण्याची मागणीही आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे.