डेल्टा प्लसचा रुग्ण आढळताच वैद्यकीय टीम सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:44+5:302021-08-14T04:33:44+5:30
भद्रावती : शहरात डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फुलेनगरमध्ये तब्बल १०८ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात ...
भद्रावती : शहरात डेल्टा प्लसचा एक रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फुलेनगरमध्ये तब्बल १०८ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील एक ५३ वर्षांची महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृहात आढावा बैठक घेताच स्थानिक प्रशासन सक्रिय झाले. वैद्यकीय अधीक्षक मनीष सिंग यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय चमू सकाळपासूनच येथील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात व्यस्त झाले. ५४ जणांची आरटीपीसीआर व ५४ जणांची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. यातील एक ५४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच डेल्टा प्लस रुग्णाच्या नातेवाईकांची व संबंधितांची चाचणी केली असता, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. घेतलेल्या चाचणीचा पुढील अहवाल आल्यानंतरच या परिसरात पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, असे डॉ. मनीष यांनी ‘लोकमत’ला सांगितले.