चेंबर ऑफ कॉमर्सची पोलीस विभागासोबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:48+5:302021-06-11T04:19:48+5:30
चंद्रपूर : कोरोना संकट, सायबर गुन्हेगारी, चोरी, लाॅकडाऊन काळ, लेव्हल १ अनलॉकमध्ये कोरोनापासून संरक्षण कसे करायचे, सोशल डिस्टन्सिंग कसे ...
चंद्रपूर : कोरोना संकट, सायबर गुन्हेगारी, चोरी, लाॅकडाऊन काळ, लेव्हल १ अनलॉकमध्ये कोरोनापासून संरक्षण कसे करायचे, सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे यासोबतच चंद्रपूरची वाहतूक आणि घ्यावयाची खबरदारी यावर चेंबर ऑफ कॉमर्स आणि पोलीस विभागाची बैठक पार पडली.
याप्रसंगी रामनगर पोलीस ठाण्याचे कमलेश जयस्वाल यांनी चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी तसेच संलग्न संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांवर तोडगा काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
बैठकीला चेंबर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोढा, हार्डवेअर ॲण्ड सॅनिटरी असोसिएशनचे सचिव विवेक पत्तीवार, कपडा असोसिएशनचे सचिव नारायण तोष्णीवाल, कोषाध्यक्ष राजगोपाल तोष्णीवाल, अरुण धकाते, नरेश लेखवानी, संजय मंघानी, फ्रुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कलीम अहेमद शेख भाई, उपाध्यक्ष संजय पूनवटकर, ऑटोमोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष जतिन हवलादिया, सचिव मनीष चकनालवार, राजेश जाधवानी, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांचा चेम्बर ऑफ काॅमर्सतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीचे आयोजन रामनगर पोलीस ठाण्यातर्फे सुभाष सिडाम यांनी केले होते.