राजुरा येथे गोंडवाना यंग टीचर्स असोसीएशन संघटनेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:35+5:302020-12-30T04:38:35+5:30
या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. प्रदीप घोरपडे यांनी संघटनेच्या विविध भूमिकेविषयी आपले विचार व्यक्त केले संघटना ही शक्ती असून ...
या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. प्रदीप घोरपडे यांनी संघटनेच्या विविध भूमिकेविषयी आपले विचार व्यक्त केले संघटना ही शक्ती असून संघटनेच्या माध्यमातूनच अनेक प्रश्न सोडवता येतात म्हणून संघटना ही शक्तीअसल्याचे प्रतिपादन केले याप्रसंगी डॉ.अनिल शिंदे यांनी संघटनेने प्राध्यापकांचे प्रश्न तथा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे असा विचार मांडला. या प्रसंगी प्राचार्य डॉ संजय कुमार सिंह यांनी प्राध्यापकांचे हित महत्त्वाचे असल्याचे सांगून प्राध्यापक हा शिक्षण विकासाचा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवले पाहिजे असा विचार मांडला. या प्रसंगी डॉ. सुनील नारंजे, डॉ.नंदाजी सातपुते, डॉ. संजीव निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे यांनी प्रास्ताविकातून सभेच्या नियोजनाची व विषयाची भूमिका मांडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य करणारे डॉ.नरेंद्र आरेकर, डॉ. प्रमोद बोधने, डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. शरद बेलोरकर, डॉ.राजेंद्र झाडे, डॉ. जनार्दन काकडे, डॉ.राजू किरमिरे या मान्यवरांचा संघटनेचे वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सभेच्या अनुषंगाने प्राध्यापकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यावर सभेत चर्चा करण्यात आली .संघटनेच्यावतीने विविध पदाधिकाऱ्यांनी आणि विभाग समन्वयक यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच तसेच सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि विभाग समन्वयक यांना नोंदणी फॉर्म व पावती बुकाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचिव प्रा.विवेक गोरलावर यांनी केले तर आभार डॉ. श्रीराम गहाणे यांनी मानले.या प्रसंगी संघटनेचे सर्व पद्धधिकारी व विभाग समन्वयक प्रामुख्याने उपस्थित होते.