दारूबंदी उठविण्याचा निर्णयाविरोधात व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचकडून राज्यपालांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:02+5:302021-07-24T04:18:02+5:30

दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यात आली. या जिल्ह्यात सहा ...

Meeting of Governor from Addiction Free Maharashtra Coordinating Forum against the decision to lift the ban on alcohol | दारूबंदी उठविण्याचा निर्णयाविरोधात व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचकडून राज्यपालांची भेट

दारूबंदी उठविण्याचा निर्णयाविरोधात व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचकडून राज्यपालांची भेट

googlenewsNext

दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यात आली. या जिल्ह्यात सहा वर्षांपासून दारूबंदी लागू करण्यात आली होती. यासाठी सुज्ञ नागरिक व महिलांकडून मोठ्या संख्येने दीर्घकालीन लढा देण्यात आला होता. लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करून दारूबंदीची मागणी केली होती. याची दखल घेऊन तत्कालीन भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकारने दारूबंदी लागू केली होती. मात्र आता सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारातील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेमुळे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. लोकक्षोभामुळे हा निर्णय शासनाला मागे घ्यायला लावला पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्‍यात आली. याबाबतही व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे महामहीम राज्यपाल यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यपालांनीही दारूबंदी, व्यसनमुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगितले. मंचातर्फे मागणी करण्‍यात आलेल्या रामनाथ झा समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करून देण्‍याबाबतचे आश्‍वासनही राज्यपालांनी यावेळी दिले. यावेळी मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, राज्य निमंत्रक वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार, ॲड. रंजना गवांदे, चंद्रपूर येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सुबोधदादा उपस्थित होते.

230721\img-20210722-wa0189.jpg

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना निवेदन देताना मंच चे पदाधिकारी

Web Title: Meeting of Governor from Addiction Free Maharashtra Coordinating Forum against the decision to lift the ban on alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.