जबरानजोत शेतकऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:31+5:302021-09-07T04:33:31+5:30
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील जबरानजोत शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून आपल्या शेतात जोत करूनही जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात तत्कालीन युती ...
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील जबरानजोत शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून आपल्या शेतात जोत करूनही जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात तत्कालीन युती सरकार व आताचे महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत आहे. जबरानजोत शेतकऱ्यांना पट्टे मिळण्याच्या मागणी संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांच्या नेतृत्वात राज राजेश्वर मंदिर सभागृहात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे, जिल्हा उपाध्यक्ष श्याम गेडाम, तालुकाध्यक्ष चंद्रहास उराडे, तालुका महासचिव रवि तेलसे, शहर अध्यक्ष राजू खोब्रागडे, युवा तालुका अध्यक्ष अतुल वाकडे, तालुका उपाध्यक्ष मंगल लाकडे, आयटी सेल जिल्हा प्रमुख अविनाश वाळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.