चंद्रपुरातील समस्यापूर्तीसाठी संयुक्त विकास समितीची बैठक

By admin | Published: December 27, 2014 01:26 AM2014-12-27T01:26:36+5:302014-12-27T01:26:36+5:30

चंद्रपूर शहरातील समस्यापूर्तीसाठी संयुक्त विकास समितीची बैठक नुकतीच पार पडली. शंकरराव सागोरे यांच्या अध्यक्षतेखाली नगिनाबाग परिसरात ही बैठक झाली.

Meeting of Joint Development Committee for Problems in the Chandrara | चंद्रपुरातील समस्यापूर्तीसाठी संयुक्त विकास समितीची बैठक

चंद्रपुरातील समस्यापूर्तीसाठी संयुक्त विकास समितीची बैठक

Next

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील समस्यापूर्तीसाठी संयुक्त विकास समितीची बैठक नुकतीच पार पडली.
शंकरराव सागोरे यांच्या अध्यक्षतेखाली नगिनाबाग परिसरात ही बैठक झाली. त्यात शहराच्या विकासाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता लवकरच धरणे आंदोलन करण्याचा निर्धार घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष पांडुरंग गावतुरे, सचिव प्रभाकर अगळे, भैय्यासाहेब तोतडे, प्रा. सुरेश विधाते, हरिदास देवगडे, प्रा. अंबादास रायपुरे, बापुराव गोहोकार, निलेश पाझारे, प्रा.पी.एल. डोंगरे, मधुकर दानव, परशुराम ठोंबरे, भाऊराव हिवरे, शंकर कुंडले, यादव सपाट, अ‍ॅड.प्रमोद आनंद, कुशाब कायरकर, रंगाचारी माडघुसी, प्रा. रविंद्र चिलबुले, प्रकाश चांभारे, जेंगठे आदी सभेला उपस्थित होते.
चंद्रपूर शहराला जवळपास ५०० वर्षांचा इतिहास आहे. औद्योगिक जिल्हा असल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परकोटाच्या आत मुख्य बाजारपेठ आहे आणि ते फक्त दोनच मुख्य रस्त्यावर आहे. शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने जिथे जागा दिसेल तिथे नागरिक पार्किंग करीत आहे. परकोटाच्या बाहेर चंद्रपूर शहरात अनेक कॉलोन्या, वसाहती झालेल्या आहेत. जटपुरा गेटजवळील रघाताटे यांच्या घरापासून ते ठक्कर कॉलनीपर्यंत ३० फुटांचा रस्ता आहे. ही जुन्या काळाची पांदन आहे. या रस्त्यावर बहुतेक ठिकाणी अतिक्रमण आहे. बिनबा गेट ते रामनगरकडे जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. त्याचप्रमाणे रामनगर ते आंबेडकर कॉलेजपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. या तिनही मुख्य रस्त्यावर जे अतिक्रमण झालेले आहे ते हटविणे महानगर पालिकेची जबाबदारी आहे. चंद्रपूर मनपाकडे मुख्य रस्ते किती फुटाचे आहेत. त्याबातची नोंद असतानाही अतिक्रमण कां हटविले जात नाही? असा प्रश्न या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting of Joint Development Committee for Problems in the Chandrara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.