राष्ट्रीय ओबीसी महासंघाची २६ जुलैला दिल्लीत सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 01:55 PM2021-07-25T13:55:31+5:302021-07-25T13:56:40+5:30

चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या केंद्रीय कार्यकारणीची सभा सोमवार (दि.२६) ला दुपारी २ वाजता आंध्र भवन येथे आयोजित करण्यात आलेली ...

Meeting of National Federation of OBCs on 26th July in Delhi | राष्ट्रीय ओबीसी महासंघाची २६ जुलैला दिल्लीत सभा

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची २६ जुलैला दिल्लीत सभा

Next

चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या केंद्रीय कार्यकारणीची सभा सोमवार (दि.२६) ला दुपारी २ वाजता आंध्र भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेमधे ही सभा होणार आहे. 

या सभेत २०२१ मधे राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाविषयी चर्चा, केंद्रात ओबीसी मंत्रालय व्हावे, संपूर्ण भारत देशात नीट कोटा मधे ओबीसी विद्यार्थ्यांना यु.जी. व पी.जी. मध्ये २७% आरक्षण लागु करण्यात यावे, ओबीसी समाजाला लावण्यात आलेल्या क्रिमिलेअरच्या मर्यादेत वाढ करणे, सरकारी कर्मचा-यांना पदोन्नतीमधे आरक्षण, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय कार्यालयातील ओबीसींच्या अनुशेषाबाबत चर्चा, ७ ऑगस्ट २०२१ च्या सहाव्या महाअधिवेशनावर चर्चा आदी विषयांना घेवुन या सभेत चर्चा होणार आहे. व पुढील देशव्यापी कृतीचा आराखडा ठरणार आहे.

या सभेत जस्टिस इश्वरैया, डॉ. अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर, डॉ. खुशाल बोपचे, शेषराव येलेकर, सुभाष घाटे, चेतन शिंदे, शाम लेडे, शरद वानखेडे, शकील पटेल, प्रदिप वादाफळे, गुणेश्वर आरिकर, मधू नाईक, राजेश कुमार, श्रीनिवास गौड, कल्पना मानकर, सुषमा भड, रेखा बाराहाते आदी अनेक कार्यकारीणी सदस्य उपस्थित असणार आहेत. सोबतच देशभरातील ओबीसी प्रतीनीधी सभेत असणार आहेत.

Web Title: Meeting of National Federation of OBCs on 26th July in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.