पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:34+5:302021-08-19T04:31:34+5:30
येथील पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाची सभा पार पडली. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल जनसामन्यांची गरज बनली आहे. त्याद्वारे डिजिटल ...
येथील पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाची सभा पार पडली. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल जनसामन्यांची गरज बनली आहे. त्याद्वारे डिजिटल व्यवहारात वाढ होत आहे. या व्यवहारात सायबर चोरटे सक्रिय झाले असून, सेव्हिंग्ज खात्यातून पैसे लंपास करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी सावधगिरी बाळगून बँक खाते क्रमांक व एटीएम कार्ड क्रमांक कोणालाही सांगू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी यावेळी केले. या परिसरात दुचाकी चोरीला जात आहेत. वाहनधारकांनी वाहनांना लॉक करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी वरिष्ठ नागरिक सहाय्यता योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते नोंदणी कार्डचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन शिपाई मदारे यांनी केले. आभार ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष अशोक साळवे यांनी मानले.
फोटो- नोंदणी कार्डचे वाटप करताना पोलीस निरीक्षक योगेश घारे.