रविवारच्या सभेत गाजणार जि. प. कर्मचारी सोसायटीचा भूखंड घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:31 AM2021-09-22T04:31:05+5:302021-09-22T04:31:05+5:30
जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे शेकडो कर्मचारी सदस्य आहेत. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ लवकरच संपणार असल्याचे समजते. संचालक मंडळाने ...
जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे शेकडो कर्मचारी सदस्य आहेत. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ लवकरच संपणार असल्याचे समजते. संचालक मंडळाने जून महिन्यात कोसारा येथील सर्वे क्र. १३९ मध्ये भूखंड क्र. ५०, ५१ व ५२ ची एकूण १२ हजार चौरस पूट जमीन खरेदी केली आहे. या जागेचे शासकीय बाजारमूल्य २४ लाख ३३ हजार आहे. मात्र, या भूखंडासाठी संचालक मंडळाने २ कोटी ६७ लाख ८३ हजार १६० रुपये मोजले. ही रक्कम तीनपट किमतीने असल्याचा आरोप आहे. जमीन घोटाळ्यासाठी पदाधिकारी कारणीभूत असल्याने पदावरून दूर करून प्रशासक नेमण्याची मागणीही सदस्य सचिन मुरकुटे यांनी जिल्हा दुय्यम निबंधकांकडे तक्रारीतून केली आहे.
बॉक्स
२.५० कोटींची मुदतठेव मोडली
जि. प. कर्मचारी क्रेडिट सोसायटीची सर्वसाधारण सभा २१ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन झाली. या सभेत १७ विषयांची मांडणी केली होती. काही सभासदांनी स्वत:चे लेखी मत सोसायटीला कळविले होते. भूखंड खरेदीसाठी सोसायटीची २.५० कोटींची मुदतठेव तोडण्यात आली. याला आमसभेची परवानगी नाही, ऑनलाईन सभेचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही उपनिबंधकांकडील तक्रारीत करण्यात आला आहे.
कोट
जमीन खरेदीचा ठराव आमसभेत घेण्यात आला. सर्व सदस्यांच्या सहमतीने भूखंडाची रक्कम अदा करण्यात आली. काही सदस्यांचा याला विरोध असू शकतो. येत्या २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या सभेत हा विषय ठेवण्यात येणार आहे. त्यावर तक्रार करणाऱ्यांनी सभेत भूमिका मांडावी. चर्चेला तयार आहोत.
-अजय डोर्लीकर, अध्यक्ष, जि. प. कर्मचारी क्रेडिट सोसायटी, चंद्रपूर