काँग्रेस कार्यकर्त्यांची सहविचार सभा

By admin | Published: September 19, 2016 12:51 AM2016-09-19T00:51:38+5:302016-09-19T00:51:38+5:30

२०१६ मध्ये होऊ घातलेल्या राजुरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजुरा येथील काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची सहविचार सभा ...

Meetings of Congress workers | काँग्रेस कार्यकर्त्यांची सहविचार सभा

काँग्रेस कार्यकर्त्यांची सहविचार सभा

Next

मंथन : निवडणुकीची पार्श्वभूमी
राजुरा : २०१६ मध्ये होऊ घातलेल्या राजुरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजुरा येथील काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची सहविचार सभा आज रविवारला स्थानिक छत्रपती शिवाजी संकुल (सुपर मार्केट हाँल) राजुरा येथे पार पडली.
या सहविचार सभेचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अँड. अरूण धोटे, तालुका अध्यक्ष दादापाटील लांडे, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, गटनेते स्वामी येरोलवार, नगरसेवक सय्यद सतावत अली, शहर अध्यक्ष सुनील देशपांडे, माया पाकमोडे, वेकोलि इंटकचे शंकर दास, सुरेंद्र डोहे आदी उपस्थित होते.
या सभेला संबोधित करताना माजी आमदार सुभाष धोटे यांनी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता आपल्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करून राजुरा शहरात सातत्याने विकासाची गंगा आणणाऱ्या व सर्व सामान्य जनतेचे हित जोपासणाऱ्या काँग्रेस उमेदवारांनाच निवडून देवून पुनश्च राजुरा नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी आपल्या भाषणात राजुरा नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास पक्षाचा गड कायम राखता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या प्रसंगी राजुरा शहरातील अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सभेला नगरसेवक शाम बोलम, सोनाली येसेकर, प्रियदर्शनी उमरे, दिपा करमनकर, शारदा खंडाळे, अशोक देशपांडे, सेवादलाचे अध्यक्ष क्रिष्णा खामनकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शब्बीर पठाण, अनु. जाती-जमाती अध्यक्ष विजय उपरे, राजीव सेना अध्यक्ष भूपिंदरसिंग धोतरा, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गोलु ठाकरे यासह शहरातील हजारोंच्या संख्येने काँग्रेसप्रेमी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी केले. प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन संदिप आदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Meetings of Congress workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.