जनता महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:26 IST2018-11-16T22:25:48+5:302018-11-16T22:26:10+5:30
२० वर्षांपूर्वी जनता डी.एड. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा जनता कॉलेज मध्ये उत्साहात पार पडला.

जनता महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २० वर्षांपूर्वी जनता डी.एड. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा जनता कॉलेज मध्ये उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी जनता डीएड कॉलेजचे तत्कालिन प्राचार्य जीवने तर प्रमुख पाहूणे म्हणून बनकर, समाधान गावंडे श्रीकांत कावळे व अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. अध्यापक तेलंग अरुणावती कावळे, मोहम्मद रजा, माधव मदनकर, नंदू मसे, पोलीस अधिकारी छत्रपती चिडे आदींनी श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.
त्यावेळी वादविवाद स्पर्धेत राज्यातून पहिले आलेले व बीड येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक कचरू चांभारे, शीतल लाभे, चिमूर येथील गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे, रेखा लोहकरे, गणेश ढगे, सतीश मालेकर, प्रशांत बांबोळे, आशा प्रधान, भावना गुंडमवार, ज्ञानेश्वर चौधरी, विश्वास बानकर यांनी कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य जीवने यांनी विचार मांडले. संचालिका स्मिता जीवतोडे यांनी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्याची स्तूती केली.
मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांचा कंठ दाटून येत होता. बुलढाणा येथील संचालन गजानन वानखेडे यांनी केले. आभार प्रवीण रायपुरे यांनी मानले. स्नेहमिलनाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. डॉ. प्रकाश आमटे, मंदा आमटे यांच्याशी संवाद साधून विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतली. चंद्रपुरातील शैक्षणिक वातावरण योग्य होते. विद्यार्थी दशेत उत्तम संस्कार मिळाल्याने जीवनात प्रगती करता आली, असे मत माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असले तरी चंद्रपूर जिल्ह्याशी संवाद कायम राहिल, असा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी जाहीर केला. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध उपक्रमांवर चर्चा केली. प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक अरूण झगडकर यांनी केले. स्नेहमेळाव्यासाठी कॉलेजचे माजी विद्यार्थी कचरू चांभारे, गणेश ढगे, ज्ञानेश्वर चौधरी, गजानन वानखेडे, रेखा लोहकरे अरविंद चिडे, पल्लवी चिडे, प्रशांत मते, विश्वास बानकर, सचिन मालवी, वैशाली महाकारकार, सुनिल मंगर, विजय भेंडारकर,चांगदेव पाझारे, अरुण झगडकर, अशोक भरडे आदींसह जिल्ह्यातील ७८ माजी विद्यार्थी उपस्थित होते.