शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:29 AM2021-01-25T04:29:39+5:302021-01-25T04:29:39+5:30
या सहविचार सभेमध्ये २९ जानेवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाची पार्श्वभूमी विषयक चर्चा विस्तृतपणे करण्यात आली. सहविचार सभेच्या ...
या सहविचार सभेमध्ये २९ जानेवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाची पार्श्वभूमी विषयक चर्चा विस्तृतपणे करण्यात आली. सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल मुसळे, निवृत्त प्राचार्य रमेश जी. पायपरी, प्राचार्य राजू पारदे, मुख्याध्यापक नंदकिशोर धानोरकर याशिवाय उच्च माध्यमिकचे प्राचार्य अल्बमकर, प्राध्यापक प्रकाश लालसरे, आंबेकर, आदी उपस्थित होते.
आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानित शाळेतील पाच शिक्षक, पाच शिक्षकेतर कर्मचारी एकेका गटाने सात दिवसांच्या कालावधीकरिता मुंबईकरिता रवाना होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कोणताही शिक्षक मैदानावरून हटणार नाही. शिक्षकांच्या येण्या-जाण्याची समस्या लक्षात घेता संस्थाचालकांनी त्यांची आर्थिक अडचण दूर करावी व मदत करावी, असे आवाहन नंदू धानोरकर यांनी केले. संचालन शिक्षक मंगेश बोडले यांनी केले. प्रकाश लालसरे यांनी आभार मानले.