कोरोनात मानसिक आरोग्य जपणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:39+5:302021-05-03T04:22:39+5:30
कोरोनाची सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटत आहे. या काळात नकारात्मक भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र प्राप्त ...
कोरोनाची सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटत आहे. या काळात नकारात्मक भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र प्राप्त परिस्थितीचा स्वीकार केल्यास त्या कमी होतात. एखादे संकट आल्यास भीती, चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच आपण संकटाप्रति सावध होतो. परंतु, कधीकधी आपण ओव्हर रिॲक्ट करतो, त्यामुळे मूळ संकटापेक्षा जास्त नुकसान हे त्या भावनेने होते. ही भावना संपूर्ण मन व्यापून टाकते आणि आपली विचारशक्ती दुर्बल होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्व समाज जीवनावर कमीजास्त प्रमाणात झाला आहे. परंतु, व्यक्तीच्या परिस्थितीकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून मानातील भावना बदलत असतात. अविवेकी दृष्टिकोन असेल तर मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करावा, असेही डाॅ. विवेक बांबोळे यांनी सांगितले.
बॉक्स
तणावविरहित राहण्यासाठी हे करा
माणसाच्या मनात दररोज जवळपास सत्तर हजार विचार येतात. त्यानुसार भावना बदलत असतात. त्यामुळे आपल्याला आवडतात त्या गोष्टींवर मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. जसे खेळणे, गाणे गाणे, नृत्य, पेटिंग, चित्रकला, नव्या गोष्टी शिकणे याकडे लक्ष द्या. अतिरंजित करणाऱ्या बातम्या, व्हिडिओ टाळा, आपल्या मनातील भावना मित्र व नातलगांकडे व्यक्त करा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, विपश्यना करा. दररोज पौष्टिक आहार घ्या. व्यायाम करा यातून तणाव कमी होऊ शकतो. मात्र तरीसुद्धा नकारात्मक विचार येत असल्यास तज्ज्ञाची मदत घ्या.