चंद्रपुरात मानसिक आरोग्य कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:37 PM2018-09-10T22:37:26+5:302018-09-10T22:37:44+5:30
येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूरद्वारा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूरद्वारा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साठे होते तर उद्घाटक म्हणून आयएमएचे अध्यक्ष प्रमोद राऊत उपस्थित होते. तसेच डॉ. किरण देशपांडे, डॉ. चिनी, डॉ. इम्रान शिवजी, बनकर, शेंदरे, डॉ. कांबळे, व कार्यक्रम अधिकारी डॉ. राठोड, डॉ. प्रमोद बागडे, डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते. दीप प्रज्वलन करुन सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यादरम्यान, शहरातून रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रमोद राऊत यांनी मानसिक आजाराबद्दल माहिती सांगितली. तसेच अध्यक्ष डॉ. साठे यांनी नैराश्य बद्दल विशेष माहिती सांगितली. ताणामुळे बरेचसे आजार उदभवतात व त्यावर बोलून संवाद साधून आपण त्यावर मात करु शकतो, असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन बनकर यांनी केले तर डॉ. किरण देशपांडे प्रास्ताविक केले. तसेच या कायऱ्क्रमाचे आभार डॉ. चिनी यांनी केले. रॅलीला सर्व उपस्थितांनी हिरवी झेंडी दाखवू सुरुवात केली. या रॅलीचे नियोजन जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय, चंद्रपूर व आयएमए चंद्रपूर तसेच नर्सिग कॉलेज चंद्रपूर व सुशिला मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क चंद्रपूर यांचा सहभाग होता.
जागतिक आत्महत्या प्रतिबंधक सप्ताह १० ते १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत पार पाडण्यात येणार आहे. सदर रॅलीचे नियोजन सुरज वनकर, पराग उराडे व प्रणाली कदम, उषा गजभिये यांनी पार पाडले.