गणेशभक्तांच्या गर्दीमुळे व्यापारी आनंदले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:00 AM2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:31+5:30
कुंभार मोहल्ला, आझाद बाग परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गणेशभक्त मूर्ती खरेदी करण्यासाठी येत होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी गणेशमूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर मोठ्या मंडळांनी झगमगाट न करता गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामध्ये गणेशोत्सवासाठीबाजारपेठ सजली आहे. खरेदीसाठी शुक्रवारी दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. ग्राहकांची मोठी संख्या बघून छोट्या, मोठ्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर कोरोना संकटाच्या काळात पहिल्यांदाच हास्य फुलल्याचे बघायला मिळाले.
कुंभार मोहल्ला, आझाद बाग परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गणेशभक्त मूर्ती खरेदी करण्यासाठी येत होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी गणेशमूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर मोठ्या मंडळांनी झगमगाट न करता गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चे कंपनीच्या आग्रहावरून काही कुटुंबीय साहित्य खेरीदीसाठी बाहेर निघाले. रात्री उशीरापर्यंत गर्दी कायम होती.
गणेश मंडळांची तयारी
यंदाची गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात होत आहे. गणपतीच्या दहा दिवसातील उत्साहावर कोरोनाचा प्रतिबंध लागला आहे. गर्दी टाळून साध्या पध्दतीने हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरातील प्रमुख मंडळांनी छोटे मंडप, मिरवणूका न काढण्याचे ठरविले आहे. तसेच आरती करताना किंवा पुजा करताना शारीरिक अंतर आणि प्रशासनाचे नियम पाळण्यात येणार आहे.
२१ प्रकारच्या भाजींना मागणी
बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठे सजली आहे. इतर साहित्यासह रेडिमेड मोदकाची तसेच २१ प्रकारच्या पालेभाज्यांची मागणीही केली जात होती. अनेकांनी केवळ भाजीचीच विक्री केली.