चंद्रपुरात भडकू लागला पारा; उष्माघात रुग्णांसाठी शीत कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 05:00 AM2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:27+5:30

उष्माघात कृती आराखड्याच्या माध्यमातून मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर हे वैद्यकीय अधिकारी अधिनस्त आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. जनजागृतीसाठी हॅन्डबिल, पोस्टर बॅनर व होल्डिंग तयार केले जात आहेत. सिनेमागृह, बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे पोस्टर लावले जाईल. 

Mercury started erupting in Chandrapur; Cold room for heat stroke patients | चंद्रपुरात भडकू लागला पारा; उष्माघात रुग्णांसाठी शीत कक्ष

चंद्रपुरात भडकू लागला पारा; उष्माघात रुग्णांसाठी शीत कक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहराच्या तापमानात दररोज धोकादायक वाढ होत आहे. अशा वेळी उष्माघाताने मृत्यू होऊ नये, यासाठी चंद्रपूर मनपाने उष्माघात रुग्णांकरिता शीतकक्ष आणि दिवसभर एक मोबाइल टीम कार्यान्वित  करण्याचा निर्णय उष्माघात कृती आराखडा (हिट ॲक्शन प्लॅन) समन्वय समितीने आज मंगळवारी घेतला. आज चंद्रपूरचे तापमान ४२.३ अंश सेल्सिअस नाेंद झाली आहे.
स्थायी समिती सभागृहातील बैठकीत उपायुक्त तथा मुख्य लेखा अधिकारी संतोष कंदेवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, सचिव नगिना नायडू, महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता सू. म. पडोळे, मनपाचे नगररचनाकार मांडवगडे, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आरोग्य पर्यवेक्षक आर. व्ही. खांडरे, मनपाचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, ऑटोरिक्षा असोसिएशनचे हरिदास नागपुरे, चिल्ड वॉटर असोसिएशनचे महेश बुटले आदींसह मनपाच्या सर्व सातही शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उष्माघातामुळे होणारे मृत्यू  प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर मनपाच्या कार्यक्षेत्रात २०१६, २०१७, २०१८ व  २०१९ मध्ये हिट ॲक्शन प्लॅन अर्थात उष्माघात कृती आराखडा राबविला होता. 
यंदा एप्रिलमध्येच उष्णतेचा पारा दररोज ४० - ४२च्या वर जात असल्याने पुढे काय होणार, याबाबत चिंता उष्माघात कृती आराखडा समन्वय समितीने बैठकीत चिंता व्यक्त केली. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराची देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंद झाली.  

वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने प्रशिक्षण  
उष्माघात कृती आराखड्याच्या माध्यमातून मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर हे वैद्यकीय अधिकारी अधिनस्त आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. जनजागृतीसाठी हॅन्डबिल, पोस्टर बॅनर व होल्डिंग तयार केले जात आहेत. सिनेमागृह, बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे पोस्टर लावले जाईल. 

सर्व बगीचे व उद्याने दिवसभर सुरू
- पाणपोईसाठी स्वयंसेवी संस्थांनी पेंडॉल, मोठे रांजण व मठांची व्यवस्था केल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मनपा करणार आहे. दुपारी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या विश्रांतीसाठी सर्व बगीचे व उद्याने दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. बांधकाम मजुरांना दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंतच काम देण्याच्या  करण्यात आल्या.

महाकाली यात्रेसाठी रुग्णवाहिका
चंद्रपुरात यंदा माता महाकाली यात्रा सुरू होणार आहे.  भाविकांचे उष्माघातापासून संरक्षण करणे व  आरोग्य सेवेसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. महाकाली मंदिर ट्रस्टने भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, सावली देणारे पेंडॉल, कुलर लावावे, अशा सूचना मनपाने केल्या आहेत.

कामाच्या वेळेत बदल
चंद्रपूर शहरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करावी, असे आवाहन मनपाने केले. बांधकाम मजुरांना दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत उन्हात काम करण्याच्या दृष्टीने वेळेत बदल करण्याच्या सूचनाही दिल्या.

 

Web Title: Mercury started erupting in Chandrapur; Cold room for heat stroke patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.