वृक्ष लागवडीतून ‘वननिर्मिती’चा संदेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:50 PM2018-06-27T22:50:33+5:302018-06-27T22:51:00+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Message from 'plantation' to tree plantation | वृक्ष लागवडीतून ‘वननिर्मिती’चा संदेश द्या

वृक्ष लागवडीतून ‘वननिर्मिती’चा संदेश द्या

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पावसाच्या सलामीने चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा परिषदेमार्फत बुधवारी आयोजित वृक्षदिंडीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पावसाळी वातावरणात उत्साहात वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, आज वनाचा मोठ्या प्रमाणात होणारा ºहास बघता वृक्ष लागवड किती आवश्यक आहे, याबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. राज्यभर वृक्ष लागवड मोहीमेला उत्सवाचे स्वरुप आले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने गेल्या वर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीमध्ये भरीव कार्य केले होते. यावर्षी देखील १३ कोटी वृक्ष लागवडीमध्ये चांगला सहभाग दर्शवा, असे आवाहनही केले.
व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक रविंद्र शिवदास, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व अन्य अधिकारी उपस्थित होते
यावेळी आ. श्यामकुळे यांनी ना. मुनगंटीवार यांनी २ कोटी, ४ कोटी आणि आता १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला असून मागील मोहीमेप्रमाणेच यावर्षी देखील ही मोहीम यशस्वी होईल. ना. मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जागतिक स्तरावरचे उपक्रम, योजना राबविल्या जात आहे. चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या वाढली. पर्यटक वाढले, वेगवेगळया योजना, उपक्रमातून जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर गेले आहे, असे सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणार असून ते वृक्षाचे संगोपण करतील, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या चित्ररथाला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
वृक्षाची निगा राखण्यासाठी ‘रिपोर्ट कार्ड’
या वृक्षदिंडीच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने सलामी दिली. जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेमध्ये १२ लक्ष वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. जिल्हा परिषद १५७१ शाळांमधील १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांना एक झाड लावायला देणार आहे. त्याची निगा राखण्यासाठी वृक्षसंवर्धन कृषी कार्यक्रम तयार करण्यात आला असून महिनावार रोपाची निगा राखल्याची माहिती भरता यावे, असे रिपोर्टकार्ड तयार करण्यात आले आहे. असेच रिपोर्टकार्ड कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले आहे. या दोन्ही रिपोर्टकार्डचे प्रकाशन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.
ग्रीन आर्मीत ८ हजार ५०० वृक्षप्रेमींची नोंद
प्रास्ताविकातून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, वृक्ष लागवडीच्या मोहिमेला बळकटी देणाºया ग्रीन आर्मी नोंदणीला जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी आतापर्यंत ८५०० वृक्षप्रेमींची नोंद करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी व प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Message from 'plantation' to tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.