‘बॅलेट’मधून सामाजिक समतेचा संदेश

By admin | Published: May 20, 2014 11:31 PM2014-05-20T23:31:27+5:302014-05-20T23:31:27+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान

Message of social equality in 'Ballet' | ‘बॅलेट’मधून सामाजिक समतेचा संदेश

‘बॅलेट’मधून सामाजिक समतेचा संदेश

Next

बल्लारपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवन प्रवासात मानव मुल्यांची जोपासना करणारे कार्य केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला. सामाजिक व राजकीय सन्मान मिळवून देण्यासाठी न्याय हक्काची लढाई लढले, याचे दाखले नि:शुल्क असलेल्या ‘बॅलेट’ नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश बल्लारपूरकरांना दिला. येथील कल्याण मित्र बहुउद्देशीय संस्था व अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीच्यावतीने येथील सुभाष लॉन परिसरात नुकताच ‘बॅलेट’ नाटकांचा प्रयोग घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजनी हजारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संजय डुंबेरे, माजी आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे, चंद्रशेखर गेडाम, कल्याण मित्र संस्थेचे अध्यक्ष जे.टी. रंगारी, सचिव देवराव मेश्राम, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज वाळके, सचिव आनंदराव ठमके, नत्थू रामटेके, प्रभुदास देवगडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. रजनी हजारे म्हणाल्या, संस्था ही समाजाच्या उत्थानासाठी असली पाहिजे. समाज हिताचे कार्य त्यातून घडते अपेक्षित आहे. यासाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी एकनिष्ठेने कार्य करून लोकाभिमुख कामाला चालना देण्यासाठी झटण्याचा सल्ला त्यांनी भाषणातून दिला. प्रास्ताविक बी.बी. भगत, संचालन सचिव फुलझेले तर आभार पृथ्वीराज वाळके यांनी मानले. यावेळी रामदास आटे, भीमराव भगत, भानुदास गवई, कमलाकर रामटेके, तुळशीराम नगराळे, विष्णू वाकडे, धोपटे, ईश्वर सोमकुंवर, निमसटकर, प्रा. मालती कवाडे, मुख्याध्यापक रत्नमाला वाळके, मेश्राम, अलोने, झांबरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Message of social equality in 'Ballet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.