मजुरीसाठी शेतमजुरांचे स्थलांतर
By admin | Published: May 11, 2017 11:28 AM2017-05-11T11:28:35+5:302017-05-11T11:28:35+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात बहुसंख्य शेतमजुराचे मजुरीसाठी स्थलांतर होत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 11 -चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात बहुसंख्य शेतमजुराचे मजुरीसाठी स्थलांतर होत आहे. जिवती तालुका अतिदुर्गम भाग असून येथे बहुसंख्येने शेतकरी आणि शेतमजुर राहतात. येथे बहुतांश शेती कोरडवाहू असल्यामुळे शेतमजुराला खूप कमी रोजगार मिळतो.
त्यांच्या अन, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाही. परिणामी त्यांना दुसऱ्या गावांमध्ये पोटासाठी स्थलांतर करावे लागत आहे.
शासनाने रोजगार हमी अंतर्गत
योजना राबवल्यास शेतमजुरांना रोजगार मिळू शकेल. त्यामुळे त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही.
बहुसंख्य लोक मजुरीच्या शोधात कोरपणा, वणी परिसरात स्थलांतर करीत असल्याने टेकामांडवा ओस पडत आहे. सदर परिस्थितीची तत्काळ दाखल घेऊन शासनाने लवकरात लवकर रोजगारची संधी उपलब्ध करुन द्यावी, अशी शेतकरी शेतमजुरांची मागणी आहे.