माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे कामाच्या शोधात स्थलांतर

By admin | Published: November 28, 2015 02:07 AM2015-11-28T02:07:35+5:302015-11-28T02:07:35+5:30

दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

Migration of citizens on Manikgarh hill search | माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे कामाच्या शोधात स्थलांतर

माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे कामाच्या शोधात स्थलांतर

Next

जिवती : दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव यामुळे स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली. त्यातच मिळालेल्या उत्पनालाही शासनाचा हमी भाव नाही. यामुळे पहाडावरील अनेक गावामधील मजुर यवतमाळ, वणी, कोरपना आदी ठिकाणी कापूस वेचणी करीता तर मराठवाड्यातील परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आदी भागात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरित होत आहेत.
शाळकरी मुलांना सोबत घेवून अनेक जण जात असल्याने गेल्याने त्यांची लेखणीची बंद झाली आहे. माणिकगढ पहाडावरील नागरिकांचे स्थलांतर हा दरवर्षीचाच गंभीर प्रश्न आहे. दिवाळी झाली की, अख्खे गावचे गावच कामाच्या शोधात लहान-लहान मुलबाळांना घेवून भटकत असल्याने गावे ओस पडली आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात सिंचनाच्या सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वारंवार येथील शेतकऱ्यांना बसत असल्याने हंगाम संपण्यापूर्वीच पिकाची पानगळ होवून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. यामुळे पहाडावरील शेतकऱ्यांचा कणाच मोडला जात असून कर्जाची परतफेडही होत नाही. त्यामुळे जगायचे कसे, व संसाराचा गाडा हाकायचा कसा, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजुर काम मिळेल तिथे झोपड्या टाकून वास्तव्य करीत असले तरी आपली आर्थिक बाजू मजबूत व्हावी यासाठी दिवसंरात्र काम करून त्या ठिकाणी कसलीही सोयी-सुविधा नसतानाही आपल्या संसाराचा गाडा हाकतात. दरवर्षी पडणारा निसर्गाचा कोप दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान हे दरवर्षी होत असल्याने शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम मिळवून देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Migration of citizens on Manikgarh hill search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.